आतापर्यंत समोर आलेल्या गुजरात निवडणुकांच्या निकालांच्या आकड्यांनंतर 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एका व्हीडीओमार्फत संदेश दिला. त्यात ते असं म्हणाले की, 'गुजरातच्या लोकांच्या प्रेमामुळे 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला.या वेळेस गुजरातचा गड भेदला पण तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वेळेस हा गड जिंकून दाखवू'