गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'गुजरातच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या जनतेनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गुजरातमध्ये ज्या पध्दतीने सरकारने काम केले आहे त्यामुळे हा विजय मिळाला आहे'. 'राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व होऊच शकत नाही कारण देशाचे नेतृत्व होण्यासाठी जीवन समर्पित करावे लागतं' अशी खोचक टीकाही राहुल गांधी यांच्यावर बावनकुळे यांनी केली.