बेळगावातील राड्याचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळाले. हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली.बेळगावातील राड्यानंतर पुण्यात शिवसैनिक तर कोल्हापुरात मनसैनिक आक्रमक झालेले दिसले.
पुण्यातील स्वारगेटमध्ये शिवसैनिकांनी कर्नाटकातील गाड्यांना काळं फासलं.
इचलकरंजीत मनसैनिकांनी घोषणाबाजी देत आंदोलन केलं.कन्नडिगांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.