कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. कडेकोट बंदोबस्त असूनही हिरबागेवाडी टोलनाक्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. सांगलीतील जत, सोलापूर, अक्कलकोटवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा सांगितला आहे. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकातला वाद तापलेला दिसतोय.