राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह भाजपातील काही नेतेमंडळींनी राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सारवासारव केली होती. खासदार उदयनराजेंनी किल्ले रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमात बोलत असताना त्यांचाही चांगलाच समाचार घेतला. स्वार्थासाठी शिवरायांचा वापर करता मग अपमान केला तर गप्प का बसता? असा सवालही उदयनराजेंनी यावेळी केला.