छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी वादग्रस्त विधान केले जात आहे. नुकतचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर उदयनराजे चांगलेच संतापले आहेत. अशाच आज पत्रकार परिषद घेवून त्यांनी थेट इशारा दिला आहे. शिवाय यावेळी त्यांनी इतर पक्षांनाही आवाहन केले आहे.