राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना (Maharashtra Police Recruitment 2022) राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती. पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांना आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरती बाबत आमच्याकडे 11 लाख 80 लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
#PoliceBharti #DevendraFadanvis #EknathShinde #Maharashtra #policebhartinews #HWNews #Vacancy #Recruitment #MaharashtraPolice #MumbaiPolice #policerecruitment