सकाळ माध्यम समूह आयोजित बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धा आज पार पडली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून सुरू झालेल्या या हाफ मॅरेथॉन मध्ये भारतासह अनेक देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली. शिवाय या स्पर्धेबद्दल बोलताना आपली भावना व्यक्त केली.