"अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाला. सोलापूर (Solapur) येथे पत्रकार परिषद घेत असताना सदावर्ते (Adv. Sadavarte) यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून (Sambhaji Brigade) शाई फेक करण्यात आली. सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.
सोलापूरमध्ये अॅड. सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाई फेक केली. "
#GunratanaSadavarte #SambhajiBrigade #MaharashtraPolitics #Marathinews #Politics #hwnewsmarathi