राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजितदादांनी ते उपमुख्यमंत्री असताना राज्यपालांना भेटले होते, तेव्हाचा किस्सा सांगितला."मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा कोश्यारी यांना भेटायला जायचो. मला बऱ्याचदा राज्यपाल म्हणायचे, "अजितजी अभी बस,अभी मुझे जाना है," "मी म्हणायचो वरिष्ठांना सांगा आणि जा," त्यांना जायचे आहे आणि मात्र वरिष्ठ परवानगी देत नाहीत. त्यामुळे राज्यपाल अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत का ?, अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होत आहे," असा टोला त्यांनी लगावला.
#AjitPawar #BhagatSinghKoshyari #SharadPawar #BJP #Maharashtra #NCP #ShivSena #ChhatrapatiShivajiMaharaj #NitinGadkari