हेरा फेरी, फिर हेरा फेरी हे असे काही चित्रपट आहेत, जे आपल्याला आजही खळखळून हसवतात, म्हणजे तुम्ही रोज जरी पाहिले तरी कंटाळा येणार नाही. कारण.... यातली बाबू भैय्या-राजू-शाम-तोतला शेट यांची जबरदस्त केमिस्ट्री पण आता याचा पार्ट ३ वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कारण चित्रपटाची जान असणारा राजू भैय्या अर्थात अक्षय कुमार या पार्टमध्ये नसणारे. हे ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल, आणि त्यामुळेच सोशल मीडियावर फिर हेरा फेरीच्या पार्ट ३ वरून राडा सुरु झालाय. आणि चित्रपाची शूटिंग सुरु होण्याआधीच #नो राजू नो हेराफेरी असं ट्रेंड व्हायला सुरुवात झाली.