३१ जुलै, २०२२ ची तारीख शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ असणाऱ्या संजय राऊतांना ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. त्यानंतर जवळपास १०० दिवसांनी ९ नोव्हेंबरच्या रात्री संजय राऊतांना विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला आणि त्यांची तुरुंगातून सुटका झाली. पण, या १०० दिवसात राज्याच्या राजकारणात काय बदललं? शिवसेनेनं काय कमावलं आणि गमावलं? तेच समजून घेऊयात ५ मुद्द्यांच्या आधारे-