अभिनेत्री दिपाली सय्यदविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी दिपाली सय्यद यांच्या प्रतिमेला जोडे मारले. दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे, संजय राऊतांवर टीका केली होती. शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या दिपाली सय्यदविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं.