ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांकडून चांगलाच जल्लोष करण्यात आला. आज सकाळी राऊतांनी माध्यमांशी बोलताना आपण फडणवीसांची भेट घेणार असल्याचे म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.