कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. या महापूजेचा मान यंदा औरंगाबादमधल्या फुलंब्री तालुक्यातल्या शिरोड इथले रहिवासी असलेल्या उत्तमराव आणि कलावती साळुंखे या दाम्पत्याला मिळाला.