सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त उबाळे व अन्वी येथील गाढवे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फटाके, मिठाई, जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट देत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. तसेच उबाळे कुटुंबासह अनवी येथील आत्महत्याग्रस्त गाढवे यांच्या वारसाला शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते देण्यात आला.
#AbdulSattar #AgricultureMinister #Sillod #Aurangabad #EknathShinde #DevendraFadnavis #Diwali2022 #Farmers #Suicide #Shivsena #BJP