शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या औरंगाबादच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमधील दहेगाव भागातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला. मात्र ठाकरेंच्या याच दौऱ्यावर भाजपा आणि सत्ताधारी मंडळीकडून जोरदार टीका होत आहे. प्रविन दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.