राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचे निकाल समोर येत आहेत, दरम्यान ८८९ ग्रामपंचायतींपैकी जवळजवळ ३९७ ठिकाणी भाजपचा विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेला ८१ ठिकाणी आणि उद्धव ठाकरे यांच्आ शिवसेनेला ८७ ठिकाणी विजय मिळाला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील ११६५ पैकी १०७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे निकाल आज जाहीर केले जात आहेत. यापैकी तब्बल ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका या बिनविरोध झाल्या होत्या.
#GramPanchayatElection #DevendraFadnavis #SharadPawar #AshishShelar #MurjiPatel #Andheri #Bypoll #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra