एकनाथ खडसे म्हणाले, "तुम्ही दोन वर्षांपासून नाथाभाऊ तुरुंगात जाण्याची वाट पाहत आहात, पण तुम्ही माझी काळजी करू नका. मी बाहेरच राहणार आहे. मी काहीही केलं नाही. मी तुझ्यासारख्या चोऱ्या केल्या नाहीत आणि लबाड्याही केल्या नाहीत. कोणाच्याही जमिनी हडप केल्या नाहीत. तुमचे सुरेश दादांचे व्यवहार झाले आहेत तेही मला माहिती आहेत.
"कुणाबरोबर साखर कारखान्याचे व्यवहार झाले तेही मला माहिती आहेत. याच्या सर्व तक्रारी ईडीकडे केल्या. मात्र, त्या तक्रारी कशा दाबल्या याचीही मला पूर्ण कल्पना आहे. तू नाथाभाऊंशी काय बोलणार, कल का छोकरा है, तुझं जितकं वय नाही, तितकं नाथाभाऊंचं राजकारणातलं वय आहे," असं म्हणत खडसेंनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली.