केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह जाहीर केलं. त्यानंतर ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह मिळाल्यानं स्वागत करण्यात येतंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं पक्षाचं नाव देण्यात आलंय. त्यामुळे शिंदे गटाला मिळालेल्या या नव्या नावावरुन सोशल मीडियावर क्रिएटिव्ह डोक्यांनी बनवलेल्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय.