महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम अगदी घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. यावेळी त्यांनी केलेले अनेक विनोद प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ झाले आहेत. पण या विनोदामागचे प्रेरणास्थान कोण? स्वत:वर होणाऱ्या विनोदाकडे ते कशाप्रकारे बघतात? याबद्दल त्यांनी लोकसत्ता अड्डाच्या कार्यक्रमात खुलासा केला.