शिवसेनेचे ज्येष्ठनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील अंतर्गत वादामुळे आता पक्षाचे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तसेच शिवसेना पक्षाचे नावही तात्पुरता वापरता येणार नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना कोणत चिन्ह आणि नाव वापरणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिवसेनेला नवं नाव सुचविले आहे.