मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) पुन्हा मोठे हाती लागले आहे. NCB ने मुंबईतील एका गोदामातून 120 कोटी रुपयांचे 50 किलो मेफेड्रोन ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या माजी पायलटसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक एसके सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सिंग यांनी सांगितले की, हे MD ड्रग मुंबईतील एका गोडाऊनमध्ये लपवून ठेवले होते. खबऱ्याच्या माहितीवरून गोदामावर छापा टाकण्यात आला.
#NCB #Raid #MD #Drugs #Mumbai #AirIndia #Ex-Pilot #Jamnagar #Intelligence #HomeMinistry #2022