मुंबईतील शिवतीर्थावर उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेना पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी जवळपास ५००० शिवसैनि मुंबईकडे रवाना होतील. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने मुंबईला जाणार आहोत अशी भूमिका शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केली.
#shivsena #uddhavthackeray #sakal