शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरु केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून मेळावा घेतात. मात्र यंदाचा दसरा मेळावा हा ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी कोणाचा होणार?, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यात मुंबई महापालिकेनं मात्र शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना मेळाव्यासाठीची परवानगी नाकारली आहे. पण असं असलं तरी शिवाजी पार्कवर मेळावा आम्हीच घेणार यावर उद्धव ठाकरेंची शिवसेनाही ठाम आहे. पण पालिकेनंच आता परवानगी नाकारल्यामुळे उद्धव ठाकरे हे या मेळाव्यासाठी बाळासाहेबांचीच आयडिया वापरणार का? अशी चर्चा आता सुरू झालीये.
#UddhavThackeray #BalasahebThackeray #ShivSena #Dasara #Dussehra #KishoriPednekar #BMC #BKC #MMRDA #EkathShinde #ShivajiPark #Shivtirth #HWNews