आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) कोरोना महामारीच्या काळात झालेल्या मृत्यूबाबत लिहिण्यात आलं आहे. कोरोना नव्हे तर ऑक्सिजन तुटवड्याचे बळी असल्याचं म्हणण्यात आलं आहे. “केंद्राच्याच (Central Government) आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या स्थायी समितीने कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवडय़ाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, असा ठपका ठेवला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीचे ‘ऑडिट’ करून मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही शिफारस केली आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
#Saamna #Shivsena #NarendraModi #UddhavThackeray #72ndBirthday #Supremecourt #EknathShinde #Maharashtra #HWNews