अंड्यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे रोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. काही घरात नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंड्यांचा (Boiled eggs) समावेश दररोज केला जातो, पण अंडी उकडताना कधीकधी ती फुटतात किंवा खराब होतात. आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहुयात की कोणत्या सोप्या टीप्स आहेत ज्या वापरून आपण अंडी उकळताना ती फुटण्यापासून वाचवू शकतो.