उत्सवाच्या काळात कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होणार अशी भीती व्यक्त केली जात होती.दरम्यान, गेल्या 24 तासातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 6220 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.