महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर युकेच्या राजगादीचा वारसा चार्ल्स तृतीय यांच्याकडे आला आहे.चार्ल्स हे प्रिन्स ऑफ वेल्स होते.आता ते युनायटेड किंग्डमचे नवे राजा बनलेत.पण राजा म्हणून राज्याभिषेक होण्याआधी अनेक व्यावहारिक, पारंपरिक गोष्टींची पूर्तता करावी लागते.त्यानुसार किंग चार्ल्स III यांनी लंडनच्या सेंट जेम्स पॅलेस येथे अक्सेशन काऊन्सिलमध्ये उपस्थित राहून ही प्रक्रिया पूर्ण केली.