गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाचा गजर आता प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळणार आहे. अशातच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मुहूर्तावरच झाली पाहिजे यावर प्रत्येकाचा भर असतो. आता भारतातला मुहूर्त तर आपल्याला माहीत असतो. पण जगभरातील इतर देशांमध्ये तिथल्या सुर्योदयाच्या वेळा जशा बदलतात, तसाच मुहूर्तही बदलतो.