शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरूनही ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. कारण शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या अर्जावर महापालिकेनं कोणताच निर्णय अजून घेतलेला नाही. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमात बसेल ते करू अशी प्रतिक्रिया दिल्यानं यावरून राजकारण रंगणार का याबाबतची चर्चा सुरु झालीय. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर परवानगी मिळणार की नाही याबाबतचा संभ्रम त्यामुळे वाढलाय. दसरा मेळाव्याला अजून वेळ असला तरी या निमित्तानं ठाकरे आणि शिंदे यांच्यात राजकीय कुरघोडी होण्याचे संकेत मिळू लागलेत.