Telangana BJP MLA T Raja arrested : तेलंगणातले भाजपचे आमदार टी. राजा यांना पुन्हा अटक

ABP Majha 2022-08-26

Views 62

मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त टिपण्णी करणारे तेलंगणामधले भाजप आमदार टी. राजा यांना पोलिसांनी काल पुन्हा अटक केलीय. मंगळवारी त्यांना अटक झाल्यानंतर काही तासांतच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. या वक्तव्यामुळे त्यांना भाजपमधून निलंबितही करण्यात आलं होतं. त्यानंतर टी राजा यांच्याविरुद्ध दोन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आलीय. त्यांच्या अटकेनंतर हैदराबादमध्ये आज शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आलीय. तर एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांनी काल रात्री सर्वांना शांततेचं आवाहन केलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS