गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून यावर्षी मात्र १५ दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागानं म्हटलंय. एरवी मान्सूनचा प्रवास १७ सप्टेंबरपासून सुरु होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मान्सूननं गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरु केला होता. पण यावर्षी दोन आठवडे आधीच परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशात चांगला मान्सून झाला असला तरी उत्तर भारतातल्या काही राज्यांत तो सरासरीपेक्षा कमी झाल्यानं शेतकरी संकटात आहे.