हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाने राज्यपालांना पत्र पाठवले आहे. हेमंत सोरेन यांच्या नावावर खाणीचा पट्टा घेतल्या प्रकरणी आयोगाने ही शिफारस केली आहे.