राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यातच काल सत्ताधाऱ्यांनी कोविडच्या भितीने राजा बसला घरी...अशी घोषणाबाजी करत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गट आणि भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.