महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. आजच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात उपस्थित असलेले शिवसेनेचे सगळे नेते कोर्टातून बाहेर आले आहेत. कोर्टाच्या आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश करावा अशी विनंती करण्याचा पर्याय शिवसेनेकडे उपलब्ध आहे. दुपारनंतर तशी विनंती कोर्टाला केली जाऊ शकते. पण कोर्टात आज सुनावणी होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.