महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता 23 ऑगस्टला होणार आहे. शिवसेनेकडून 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्याने न्यायालयात पोहचलेल्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे.