"उद्या कोर्टात काय व्हायचं ते होईल, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे," असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. "जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत," असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. "जनता गद्दारांना धडा शिकवेल," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #SupremeCourt #Maharashtra #BJP #DevendraFadnavis #SanjayShirsat #HWNews