गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांच लाडकं दैवत.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.