देशाची आर्थिक राजधानी आणि जिवाची मुंबई (Mumbai) असणाऱ्या या शहरावर पुन्हा एकदा दहशतवादाचं सावट दिसून येतंय. कारण मुंबई शहराला दहशतवादी हल्ल्यानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील ३ दिवसात दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.