राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचं पहिलंच पावसाळी अधिवेशन पार पडत असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवरुन गद्दार अशा घोषणा दिल्याने संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली होती. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र बच्चू कडू यांनी गुरुवारी विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात आपल्याला शब्द दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
#BachhuKadu #MaharashtraCabinet #MonsoonSession #IndependentMLA #PraharJanShakti #Amravati #EknathShinde #DevendraFadnavis #Guwahati #Rebelion #BJP #ShivSena #HWNews