शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. हा अपघात होण्यामागे ‘हायवे हिप्नोसिस’ हे कारणही सांगितलं जातंय. पण ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी काय करावे लागतं? याबद्दल के.ई.एम रुग्णालयाचे माजी डीन अविनाश सुपे यांनी लोकसत्ता डॉट.कॉमशी बोलताना सविस्तर माहिती दिली.