“या पेक्षाही मोठी देशसेवा त्यांना करायची असेल...”, प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचा खोचक टोला| Beed

HW News Marathi 2022-08-13

Views 22

75 व्या अमृत महोत्सवानिमित्त परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मराठवाड्यातील सर्वात विशाल तिरंगा ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाची उंची दीडशे फूट असून सबंध शहरभरातून हा ध्वज फडकताना पाहायला मिळतोय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी परळीकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. तर माध्यमांशी साधण्यात आलेल्या संवादा दरम्यान बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर मुंडेंनी निशाणा साधला आहे. या कार्यक्रमासाठी खासदार प्रीतम मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली आहे. त्यांना अति महत्त्वाचं यापेक्षाही मोठी देशसेवा करायची असेल म्हणून त्या आल्या नाही. असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना लगावला आहे. तर शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात त्यांच्या पक्षातील मंत्री का नाहीत? त्याचं उत्तर पंकजा मुंडेच देऊ शकतील असं धनंजय मुंडे म्हणाले. सरकार कोणाचं ही असो कोणतही काम रखडणार नाही. असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

#DhananjayMunde #PankajaMunde #PritamMunde #NCP #Beed #SharadPawar #BJP #DevendraFadnavis #EknathShinde #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS