कधी होणार कधी होणार म्हणत अखेरीस 40 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण विस्तार होऊन 48 तास झाले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. विशेष म्हणजे, प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येकी दोन-तीन खात्यांचे पर्याय विचारण्यात आले असल्याचे समजतेय. ते पर्याय मंत्र्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाला पाठवले देखील आहेत. मात्र अद्याप कोणत्या मंत्र्याला कोणती खाते द्यायची हे कळवण्यात आले नाही. अशातच मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा देखील बाकी आहे. त्याविषयी माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार कधी होणार याविषयी भाष्य केलं आहे.
#EknathShinde #UdaySamant #Maharashtra #CabinetExpansion #BJP #DevendraFadnavis #ShivSena #DeepakKesarkar #HWNews