मनोरंजनाचा डबल डोस घेऊन 'दे धक्का २' चित्रपट ५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने 'दे धक्का २' चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी मेधा मांजरेकर यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का कोणता?याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी महेश मांजरेकर यांच्या कर्करोगाबाबत स्पष्टपणे सांगितलं.