युवसेना (YuvaSena) प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना शिवसेनेचे (ShivSena) कार्याध्यक्षपद देण्यात यावं, अशी मागणी पक्षातून केली जात आहे. विशेष म्हणजे ठाकरेंचे (Uddhav Thackeray) धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनाही राजकीय मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. युवा सेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेची ग्राऊंडवर पकड मजबूत करण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या स्वभावाशी समरस असलेल्या तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवल्यास सेनेत नवे स्फुरण, नवे चैतन्य संचारेल, शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढेल, अशी चर्चा किंवा तसे मत युवा सैनिकांनी व्यक्त केले आहे.
#AdityaThackeray #TejasThackeray #UddhavThackeray #ShivSena #BalasahebThackeray #YuvaSena #SanjayRaut #Maharashtra #HWNews