श्रावण महिन्यामध्ये या सोमेश्वर मंदिरात शिवभक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तसेच श्रावण महिन्यात नागाचे दर्शन या सोमेश्वर मंदिरात होते. सोमेश्वराच्या दर्शनाने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भक्तांचा विश्वास आहे.
नजीकच्या काळात, मंदिराच्या परिसरात बारा ज्योतिर्लिंग सुंदर रित्या हुबेहूब साकारले आहे. त्यामुळे जर तुम्हाला या श्रावणात विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर या श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या.