शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण याचा प्रत्यक्ष अनुभव आपण मागील दिवसांमध्ये घेतला. शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक उलतापालथी झाल्या. यात आता शिवसेना संपली असल्याची चर्चाही सुरू झाली. पण स्वत:चे आजारपण असो की पक्षातल्याच नेत्यांची बंडखोरी असो, उद्धव ठाकरे यांची लढाई न डगमगता आजही कायम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांची हि लढाईवृत्ती आजचीच नाही. या आधीही अशा अनेक कठिण प्रसंगासमोर त्यांनी कधीही हार मानली नाही. अशाच तीन गाजलेल्या किस्स्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत -