महागाईच्या मुद्यांवरून गोंधळ घातल्याबद्दल राज्यसभेतील १९ खासदारांना तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विरोधकांनी महागाईच्या मुद्यावरून गोंधळ घातला होता. निलंबित करण्यात आलेले सर्व खासदार विरोधी पक्षातील आहेत.