अभिनेता शरद पोंक्षे हे सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. यासोबत ते काँग्रेसवर देखील टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच पुण्यात एका विद्यालयात कार्यक्रमावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका करत सावरकरांची दहशत वाढली पाहिजे असं मत व्यक्त केलं.